Showing posts with label थेंब अस्तित्व पूर्वसंचित सहवास. Show all posts
Showing posts with label थेंब अस्तित्व पूर्वसंचित सहवास. Show all posts

Saturday, 11 August 2012

अस्तित्व

ढगातुन पडून पोरका झालेला थेंब
जिथे पडतो तिथेच त्याचे अस्तित्व
नभातुन भूमीवरच्या या प्रवासात
त्याच्या इच्छेला नसते महत्व
पण पूर्वसंचित चांगलं
तर योग्य ठिकाणी पडतो
झरा, नदी, सागर यात
एकरूप होऊन प्रवाहित होतो
सहवास चांगल्याचा
म्हणून पूजनीय बनतो
नेमका जर पडला डबक्यात
अस्तित्व त्याचे कुजते
त्याची काहीही चूक नसताना
जगण्याची आशा विझते



- माझी आई