Saturday, 30 July 2011

हे देवा


हे देवा, मला फार दूर जायचे आहे,
स्वत:च्या मनगटावर, मला जग जिंकायचे आहे,
रात्र असो वा दिवस, मला पुढे जायचे आहे,
स्वत:च्या हिमकतिवर, मला पुढे जायचे आहे,
विरोधक नसावा म्हणून मागतो आहे मदत,
नाही तर कुणाला भाव द्यायचे नाही असे आहे माझे मत,
पुढे जाण्यासाठी देणार आहेस का मला साथ?
नाहीतर लक्षात ठेव आहे माझाशी गाठ,
तू जरी नसला बरोबर, तरी नाही माझे अडत,
माझे कर्मच देईल मला मोठी बढत,
दुसर्यावर अवलंबून राहने नाही माझी सवय,
मिळवून घेईन सर्व ते, जे मला हवय,
भौतिक सुख मी माझे मिळवून घेईन,
तुला कही लागल्यास तुला पण देईन,
तुला काय पाहिजे ते मागुन घे,
फ़क्त तू  मला लढन्याची शक्ति दे!!!!