Saturday 6 August 2011

पाऊस

पाऊस आल्यावर 
मुसळधार बरसतो,
विचारच करत नाही
खाली कोण कोण भिजतो,

असते त्याला फक्त
एकच काम,
तहानलेल्याना तृप्त करने 
विनादाम,

उत्साहाने शेतात
कामाला लागतो शेतकरी, 
"ये रे ये रे पावसा" म्हणत
भिजतात पोरपोरी,

तुझ्या वर्षावात 'त्याला' 
 'तिच्या' छत्रीत जागा मिळते,
तुझ्या उपस्थितीत मग त्यांच्या
प्रेमाला पालवी फूटते,

तुला भेटण्यासाठी नोकरदारवर्गही 
घेतो आजारपणची रजा,
स्वेटर, कानटोपी घालून वृद्धही
घेतात तुझ्या थंडाव्याची मजा,

हातचे राखुन न ठेवता
तू करतो तुझे कर्म,
म्हणून पाण्यालाही
आम्ही मानतो धर्म,

आपल्यात आणि पावसात
असाच साम्यपणा असावा,
फक्त पाण्याऐवजी आपण
प्रेमाचा वर्षाव करावा.