Thursday 10 May 2012

अजून त्यांची वाट बघतो आहे..

गेल्या काही दिवसांपूर्वी बाल्कनीतल्या रिकाम्या कुंडीत  2 अंडे दिसले. ते अंडे कुणाचे आहे ते काही कळेना. आता तुम्हीच  फोटो  बघा आणि ओळखा. 

दिवस  1 ला 



दिवस 2 रा 




दिवस 4 था



दिवस 7 वा




दिवस 9 वा



दिवस 15 वा



दिवस 21 वा



आता तुम्ही ओळखले असेल  कि हा पक्षी कोणता आहे ते. सुरुवातीला काही दिवस  खूप  मजा आली ह्या पक्ष्याबरोबर खेळताना. पण  नंतर  त्यांच्या घाणीचा वास  असहाय  झाला होता. 21 दिवस झाले तरी उडत नवते. कुंडीबाहेर येऊन  बाल्कनीत  फिरत  आणि बाल्कनीभर घाण  करत  अ सत . कधी  कधी घरात  येत. ह्या जंगली कबुतरांनी उडून  जावे असे मनापासून  वाटत. कदाचित  अतिपरिचयात  अवज्ञा . साधारण  अंड्यातून बाहेर आल्यानंतर 40 दिवसांनी हे दोघे कबुतर उडून गेले. ते उडून  गेल्यावर बाल्कनी सुनी सुनी वाटत आहे. कुणाला हे कबुतर सापडल्यास  त्याने आणून  द्यावे. मी अजूनहि  त्यांची  वाट बघतो आहे....

4 comments:

  1. मित्रा,
    काही जण निघून गेल्यावर काहीतरी वाटत राहतं...यालाच जीवन म्हणतात..दुसरं काय?

    ReplyDelete
  2. हो खरे आहे केदार...

    ReplyDelete
  3. कबूतर च्या जागा पोपट पायजे होता

    ReplyDelete