Tuesday, 30 December 2014

संकल्प


        नव वर्ष सुरु होत आहे. दरवर्षा  प्रमाणे हे वर्षही आपण सर्वांना चांगले गेले असावे असा आशावाद व्यक्त करतो. दरवर्षाप्रमाणे आपण ह्याही वर्षी संकल्प करणार आहोतच. (संकल्प किती दिवस टिकतो  हे आपल्यालाच माहित अहे.) सगळ्यांनसाठी एक चांगला संकल्प सुचवायचा मी प्रयत्न करत आहे. हा संकल्प असा आहे की तो वर्षातून फ़क्त २-३ वेळा पार पाडायचा आहे आणि तरी पण आपण संकल्प केल्याचा आनंद मिळवायचा आहे. असा हा आगळा वेगळा संकल्प आहे रक्तदान (रक्तसेवा)!

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान

रक्ताचा कारखाना नाही, रक्ताला पर्याय नाही म्हणूनच रक्तदान हेच जीवनदान !!!!!!
तुमच्या रक्ताची कुणातरी खूप गरज आहे.

रक्तदान का?

हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, कर्करोग, बाळंतपण, अपघात, पंडुरोग तसेच थालेसेमिया, हिमोफिलिया या आजारांच्या परिस्थितीच्या वेळी रक्ताची खूप गरज असते. अशा वेळी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करणे हाच एकमेव पर्याय असतो.

रक्तदान कुणी करावे?
  • १८ ते ६० वर्ष वयोगटातील निरोगी व्यक्ती दर ३-४ महिन्यांनी व महिला दर ६ महिन्यांनी रक्तदान करू शकतात.
  • वजन किमान ४५ किलोग्राम,
  • हिमोग्लोबिन किमान १२.५ ग्रॅम%

रक्तदानाचे फायदे

  • नवीन रक्तनिर्मितीस चालना मिळून रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
  • नियमित राक्तदानामुळे हृदयरोग,कर्करोग इ. आजाराची शक्यता कमी होते.
  • रुग्णाचे प्राण वाचवल्याचे असीम समाधान मिळते. सामाजिक बांधिलकी जपल्याचे समाधान मिळते.
     आपल्या वाढदिवसाला अथवा अन्य आनंदाच्या दिवशी रक्तदान करून कुणाला तरी जीवनदान दया. 
नविन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा!