Tuesday, 20 December 2011

भारतीय social site users असंवेदनशील आहेत का?

 गेल्या ८-९ महिण्यामध्ये मध्य पूर्व आफ्रीकेतील बर्याच देशांमध्ये क्रांती घडून आली. ह्या क्रांतीमध्ये social sites चा फार मोठा उपयोग करून घेण्यात आला. फेसबुक, ट्विटर च्या माध्यमातून आंदोलनाचे आवाहन केले गेले आणि म्हणूनच आंदोलन यशस्वी झाले. भारतात पण जनलोकपाल विधेयकसाठी फेसबुक, ट्विटर च्या माध्यमातून आंदोलनाचे आवाहन केले गेले आणि ते पण यशस्वी होत आहे. भारतात social sites वरून केलेले आवाहन आणि त्याला मिळालेला प्रतिसाद स्तुत्य आहे. परंतु भारतीय social site users संवेदनशील आहेत? मला आलेल्या अनुभवावरून तर नक्कीच नाही. ऐका माझा अनुभव आणि तुम्हीच ठरवा.
       ४-५ महिन्यांपूर्वी माझ्या एका मित्राच्या आईला cancer असल्याचे निदान झाले. तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. त्यासाठी किमान ४ रक्त पिशव्यांची गरज होती. परंतु रक्त बँक मधून फक्त एक रक्त पिशवी उपलब्ध झाली. त्यामुळे मी फेसबुक वरून रक्तदानसाठी माझ्या अकौंट मध्ये जोडलेले मित्र आणि विविध प्रकारचे groups मिळून किमान ३००० social site users ला आवाहन केले. त्या पोस्ट ला मिळालेला प्रतिसाद पाहून मी थक्क झालो. चक्क ० लाईक आणि ३ कमेंट्स!
     एरवी माझ्या कोणत्याही नॉर्मल पोस्टला चांगला प्रतिसाद मिळतो. पण ह्या पोस्टला मिळालेला प्रतिसाद पाहून मला वाटते कि भारतीय social site users असंवेदनशील आहेत. आपले काय मत आहे हे कळवा.
    


     
                       

Friday, 16 December 2011

गेली ती वेळ

कॉलेजच्या पहिल्या दिवशी बघितले मी तिला,
लव्ह अट फर्स्ट साईट काय असते हे कळले मला,
तिला बघण्यासाठी रोज लेकचरला बसायचो,
सरांनी प्रश्न विचारल्यावर मात्र केविलवाणी हसायचो,

मी तिच्या मागे फिरतो हे तिलाही कळत होते,
म्हणून नोटस घेण्याच्या निमित्ताने तिने मला थांबले होते,
मैत्रीचा प्रस्ताव तिनेच ठेवला अन मी होकार भरला,
मन आनंदाने आले भरून, वाटले आता येईल प्रेमाला बहार,

ती जिथे तिथे मी, झाले एकच समीकरण,
ठावूक नव्हते तिला, पण यात होते माझच राजकारण,  
कळलेच नाही तिला, मी तिच्यावर झालो कधी फिदा,
वाटायचे तिला आपली मैत्री झाली जादा,

संपत आले कॉलेज, संपत आली वर्ष चार,
कस काय सांगू तिला याचा विचार केला फार,
अन एके दिवशी कॅन्टीनमध्ये येण्याची विनंती तिने केली,
आल्याआल्या  पिझ्झाची ओर्डरही तिनेच दिली,

मान खाली घालून म्हणाली मला "किंग, "
"कालच झाली एंगेजमेंट, हि बघ रिंग !"
ऐकून हे, झालो मी गपगार,
जणू तलवार गेली हृदयाच्या आरपार,

अंगठी दाखवताना डोळेच तिचे बोलले,
"विचारले नाही कधी तू मला म्हणून तुला सोडून चालले,"
"हिम्मत होत नव्हती ग, वाटायचे तुटेल मैत्रीचे नात,"  
"मी नाही विचारले तर तू विचारायला हवे होत,"

"विचारतोय आता, येशील का ग माझ्याबरोबर ?"
"नाही म्हणू नकोस, उत्तर दे खरोखर,"
डोळ्यात आले पाणी माझ्या, घातली तिला गळ,
हुंदका कसाबसा आवरत म्हणाली, "गेली ती वेळ !"